अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून माघारी परतणार

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार मान्सून बरसला आहे. तर दिल्ली, युपी, बिहारच्या अनेक भागात लोक जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत जोरदार वारे वाहतील. मात्र, पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत मोठा पाऊस शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत १ जूनपासून नियमित ४७४.० मिमी पावसाच्या तुलनेत फक्त ३४४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाच दिवस ढगाळ हवामान राहील आणि हलका पाऊस कोसळेल.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये २८ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. पश्चिम बंगाल व सिक्किममध्ये २९ ऑगस्ट, दक्षिण पूर्व यूपी व बिहारमध्ये २८ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस शक्य आहे. हिमाचल प्रदेशमध्ये २८ ऑगस्ट आणि उत्तराखंडमध्ये २८ व २९ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थानमध्ये धौलपूरमधील चंबळ नदी धोक्याच्या इशाऱ्यावरून वाहत आहे. पुरामुळे अनेक गावांना विस्थापित व्हावे लागले आहे. सैन्यदलाने बचाव व मदतकार्य सुरू ठेवले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या टप्प्यापासून परतीच्या मार्गाला लागेल. मान्सूनची नेहमीची परतीची तारीख १७ सप्टेंबर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here