मान्सून अपडेट: देशात पुन्हा मान्सून सक्रिय, अनेक राज्यांमध्ये होणार पाऊस

नवी दिल्ली : देशात आता पुन्हा वातावरण बदलले आहे. मान्सून पुन्हा सक्रीय तो असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयएमडी आणि स्कायमेट वेदरने दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. देसाच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला. मात्र, दिल्लीसह काही राज्यांचे तापमान वाढले आहे. हवामान विभागाने दिल्ली, युपीसह अनेक राज्यांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार युपी, बिहारसह दिल्ली, हरियाणा, राजस्थानच्या काही भागात पाऊस कोसळेल. आयएमडीने उत्तर-पश्चिम मान्सून सक्रिय होण्यासह दिल्लीत शुक्रवारी मध्यम पावसाचा ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमान ३२ डिग्री सेल्सीयसपर्यंत कमी येईल. पुढील ४८ तासात राजस्थानाची पावसाची शक्यता आयएमडीने व्यक्त केली. ओरिसा, झारखंडसह इतर क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा आहे. तर स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासात पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओरिसाच्या काही भागात तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर – मध्य महाराष्ट्रात, गुजरात, तेलंगणाच्या काही भागात पाऊस पडेल. आयएमडीने युपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश , हरियाणा, दिल्लीत पुढील दहा दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here