15 ऑक्टोबरनंतरच मान्सूनची माघार

134

पुणे : यंदाच्या मान्सूनचा राजस्थानातून सुरु होणारा प्रवास लांबल्यामुळे अजूनही सर्वत्र पावसाचा मुक्काम चांगलाच वाढला आहे. राजस्थानातून मान्सूनचा परीतचा प्रवास 1 ऑक्टोबर नंतर सुरु होणार आहे. तसेच महाराष्ट्रातही पाउस नवरात्रोत्सवातही रेंगाळणार आहे. त्यामुळे राज्यातून दि. 15 ऑक्टोबरनंतरच मान्सून माघार घेईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वास्तविक पाहता, मान्सून जुलै महिन्याच्या मध्यावधीच संपूर्ण देश व्यापत असतो. पण यंदा मात्र मान्सून सरासरी वेळेपेक्षा उशिराच आला. त्यानंतर मात्र मान्सून जोरदार बरसला. देशातील किरकोळ भाग वगळता सर्वत्र चांगला पाउस झाला. अनेक भागात महापूरानेही जिवन विस्कळीत केले. शिवाय शेतीचे, पिकांचे अतोनात नुकसान या पावसाने केले आहे. आता जरा कुठे जिवन पूर्वपदावर येत आहे, मात्र पावसाने काही मुक्काम अजून हलवलेला नाही.

मान्सूनने 1 सप्टेंबरपासून पश्‍चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरु करणे गरजेचे आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सध्या मध्य पाकिस्तान आणि आसपासच्या भागात, तसेच पश्‍चिम राजस्थान या भागात पाउस सुरु आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. पाउस परतण्यासाठी पश्‍चिम राजस्थानच्या भागात अ‍ॅन्टी सायक्लाीन तयार होणे गरजेचे आहे. तसेच हवेतील आर्द्रता कमी असणेही आवश्यक आहे. पण सध्या अशी स्थिती दिसत नाही, त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here