लखनऊ(उत्तरप्रदेश): राज्यात कोरोना वायरस ची वाढती प्रकरणे पाहून, ऊस विकास विभागाने सॅनिटायजर च्या उत्पादनासाठी डिस्टिलरी, साखर कारखाने आणि सॅनिटायझर निर्मिती प्लांट यांच्या परवान्यांची संख्या वाढवली आहे.
ऊस विकास मंत्री सुरेश राणा म्हणालेे, विभागाने मोठया प्रमाणात सॅनिटायजर उत्पादित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे, जे केवळ उत्तर प्रदेेशातील विविध भागातच नाही तर राज्यांमध्येही याचा पुरवठा केला जाईल.
राणा यांनी सांगितले की, येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी काही प्लांटनाही सॅनिटायजर उत्पादनासाठी परवाना दिला जाऊ शकतो. 48 प्लांट पैकी 29 साखर कारखाने आणि लिकर डिस्टिलरी आहेत आणि 19 हॅन्ड सॅनिटायजर निर्माण प्लांट आहेत. राज्य सरकारने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत स्वच्छता प्रकियेला गती आणली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.