अधिक ऊस उत्पादनामुळे कारखान्यांवर राहिल गाळपाचा दबाव

176

सहारनपुर, उत्तर प्रदेश: जिल्ह्यामध्ये यंदा ऊस क्षेत्रफळामध्ये जवळपास सहा हजार हेक्टरची वाढ झाली आहे, ज्यामुळे जवळपास 30 लाख क्विंटल अधिक ऊस उत्पादन होण्याची शक्यता आहे. अशा परीस्थितीत साखर कारखान्यांवर ऊस गाळपाचा दबाव राहिल.

ऊस क्षेत्रफळ आणि उत्पादनाच्या अंदाजाला पाहता यावेळी ऊस विभाग जिल्ह्यात 27 ऑक्टोबर पासून गाळप सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे, तर गेल्या हंगामात 2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान कारखाने सुरु झाले होते. याशिवाय जिल्ह्यात गुर्‍हाळाचे तीन प्लांट आणि जवळपास 300 कोल्हू देखील गाळप करतील.

जिल्ह्यामध्ये यावेळी 1.07 लाख हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाची शेती आहे. जी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास सहा हजार हेक्टर अधिक आहे. यामुळे ऊस उत्पादनातही 30 लाख क्विंटलची वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये सहा साखर कारखाने गाळपासाठी तयार होत आहेत. कोल्हू आणि गुर्‍हाळाची संख्या वाढल्याने ऊस गाळपाचा दबाव थोडा कमी होईल. जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी यांनी सांगितले की, यावेळी जवळपास सहा हजार हेक्टर अधिक ऊसाचे क्षेत्रफळ आहे. जवळपास 30 लाख क्विंटल ऊस जास्त होण्याची शक्यता आहे. साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरु करण्याची तयारी अंतिम टप्यात आहे. कारखान्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने सुरु केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here