बिहारमध्ये १७ इथेनॉल प्लांट्सला मंजुरी

नवी दिल्ली : बिहार गुंतवणूकदार परिषदेला सर्वात चांगला प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, बिहार इन्व्हेस्टर्स मीटमध्ये (Bihar investor meet) ११० कंपन्यांनी सहभाग नोंदवला. आयटीसी, अदानी ग्रुप, अंबुजा सीमेंट, बांगर सीमेंट, एचयूएल अशा कंपन्यांचे सीईओ आणि एमडी बैठकीस उपस्थित होते.

मंत्री हुसेन म्हणाले की, आम्ही पहिल्यांदा राज्याचे इथेनॉल धोरण तयार केले आहे. आमच्याकडे मक्क्याचे मोठे उत्पादन आणि भरपूर प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे राज्यात १७ हून अधिक इथेनॉल प्लांट्सला मंजुरी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, आम्ही मुंबई, अहमदाबाद आणि पाटणामध्ये रोड शो करणार आहोत. आम्ही मुझफ्फरपूरमध्ये मेगा फूड पार्क तयार करीत आहोत. आणि अदानी समूहाने या फुड पार्कमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली आहे. कार्यक्रमाला राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here