यमुनानगर जिल्ह्यात ६० हजार एकरहून अधिक क्षेत्रातील भाताचे पिक खराब

यमुनानगर : अलिकडेच झालेल्या पावसाने आणि पुराच्या पाण्याने जिल्ह्यात ६३,८७३ एकरातील भाताचे पिक खराब झाले आहे. पिकांच्या हानीबाबतच्या विभागवार वितरणानुसार, विलासपूर विभागात ९.०६२ एकरात भाताचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्व सात विभागामध्ये ते सर्वाधिक आहे. रादौर विभागात ७,४८६ एकर पिकाचे नुकसान झाले आहे. सरस्वती नगर विभागात ३,१४९ एकर, जगाधरी विभागात २,४०७ एकर, छछरौली विभागात १,८८९ एकर, साढोरा विभागात ९४१ एकर आणि प्रताप नगर विभागात ६०० एकरमध्ये पिकाचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, पुराचे पाणी शेतकऱ्यांसाठी संकट ठरले. त्यामुळे भात, ऊस आणि ओल्या चाऱ्याचे नुकसान झाले. भाताचे पिक शेतातच कुजत आहे अथवा वाळत आहे. गेल्यावर्षीसुद्धा भात पिक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे आणि त्यांना पुरेशी आर्थिक मदत गरजेची आहे.

हरियाणा कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाचे विषय तज्ज्ञ (रोप संरक्षण) राकेश पोरिया यांनी सांगितले की, विभागातील सर्व्हेनुसार सुमारे ८१,२५६ एकर जमिनीवरील भात, ऊस, मक्का, डाळवर्गीय पिकांचे नुकसान पुरामुळे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here