मझोला साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

खटिमा : उत्तराखंड- उत्तर प्रदेशच्या सीमेवरील मझोला साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी शहरातून मोर्चा काढून साखर कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

गेल्या ११ वर्षांपासून मझोला सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांतील शेकडो शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीतून जावे लागत आहे. याशिवाय साखर कारखाना बंद पडल्याने हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. विभागातील शेतकरी दीर्घकाळ हा कारखाना सुरू व्हावा यासाठी आंदोलन करीत आहेत. आता शेतकरी आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांनी जनजागृती मोहीम राबविली.

यादरम्यान भारतीय किसान युनीयनशी संलग्न शेकडो शेतकरी मझोला साखर कारखान्यासमोर एकत्र आले. त्यांनी मिरवणूक काढून निदर्शने केली. आता कारखाना सुरू केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रचारात अनेक पक्ष आश्वासन देतात. मात्र त्यांना भुलणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. युनियनचे अध्यक्ष के. व्ही. सिंह, सर्वजित सिंह, गगन सिंह, प्रभराय, दर्शन सिंह, कपिल अग्रवाल, हरदेव सिंह, शुक्ला आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here