बागपत, उत्तर प्रदेश: खासदार डॉ. सत्यपाल सिंह सोमवारी रमाला सहकारी साखर कारखान्यात आले त्यांनी साखर कारखाना आणि उत्तम ग्रुपच्या अधिकार्यांसह आढावा बैठक घेतली. शेतकर्यांच्या मागण्या पाहता त्यांनी लवकरच साखर कारखाना सुरु करण्याचे निर्देश दिले. खासदारांनी गेल्या वर्षाचे उदाहरण देवून टरबाइन चे संचालन योग्य पद्धतीने करण्यास सांगितले. त्यांनी पॉवर हाउस पोचून टरबाइन चे निरीक्षण केले. टरबाइन चालवणार्या अधिकार्यांशी चर्चा केली. अधिकार्यांनी खासदारांना सांगितले की, 16 ऑक्टोबर पासून टरबाइन चे संचालन लो आरपीएम वर केले जात आहे. 27 ऑक्टोबर ला स्टीम ब्लोईंग बरोबर टरबाइन ची मास्टर ट्रायल सुरु केली जाईल. त्यानंतर टरबाइन चे संचालन होईल. खासदारांनी अधिकार्यांना सांगितले की, गेल्या वर्षीप्रमाणे टरबाइन मध्ये कोणतीही खराबी येवू नये. यार्डमध्ये ऊस घेवून येणार्या ट्रॉल्याना योग्य पद्धतीने वजनकाट्या पर्यंत पोचवण्याच्या बाबत माहिती घेतली. खासदारांनी साखर कारखाना अधिकार्यांना बरेच निर्देश दिले. दरम्यान साखर कारखाना व्यवस्थापक आरबी राम, मुख्य अभियंता एपी सिह आदी अधिकारी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.
















