खासदार मलूक नागर यांनी संसदेत मांडला ऊस थकबाकी, महागड्या पेट्रोल-डिझेलचा मुद्दा

बिजनौर : बिजनौरचे खासदार मलूक नागर यांनी संसदेच्या अधिवेशनातील पहिल्याद दिवशी शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी आणि महागड्या पेट्रोल-डिझेलबाबत प्रश्न उपस्थित केला.

खासदार मलूक नागर यांनी नियम ३७७ अन्वये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, ऊस दरात वाढ तसेच ऊस खरेदीच्या थकबाकीबाबत देशाच्या हितानुसार, शेतकऱ्यांच्या बाजूने मांडणी करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी यापूर्वीही अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, ऊसाचा दर वाढवणे आदी प्रश्न मांडले आहेत. लवकरात लवकर ऊस खरेदी दर वाढवावा, यासोबतच उत्पादन खर्चापोटी अनुदान वाढीबाबत मागणी करण्यात आली. पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटी तसेच देशभरात लाखो कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे साखर कारखान्यांकडे थकले आहेत. हे पैसे लवकर मिळाले तर देशातील शेतकरी आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल असे त्यांनी सांगितले. त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्र्यांबाबत २०१४ पासून आतापर्यंत पेट्रोलियम आणि गॅसच्या दरातील वाढीबाबत विचारणा केली. पेट्रोल, गॅस तसेच डिझेलच्या दरातील वाढ कमी करण्याची मागणी केली.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here