मंडलिक साखर कारखाना अध्यक्षपदी खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर : हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे खासदार संजय मंडलिक यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी शिवाजीराव इंगळे (शेंडूर) यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी एकमताने करण्यात आल्या.

कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष पदासाठी विश्वासराव कुराडे व प्रकाश पाटील यांनी नाव सुचवले. उपाध्यक्षपदासाठी कैलास जाधव आणि विरेंद्र मंडलिक यांनी नाव सुचविले. निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत बनसोडे होते. यावेळी तुकाराम ढोले, के.डी.शिंदे, महेश घाटगे, मंगल तुकान, धनाजी बाचणकर, संभाजी मोरे, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here