ऊस दरवाढीच्या घोषणेबाबत खासदार वरुण गांधी यांची युपी सरकारवर जोरदार टीका

पिलिभीत : भाजप खासदार वरुण गांधी यांनी बिसलपूर तहसील सर्कलमधील बमरौली गावातील एका भेत बोलताना सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामादरम्यान ऊसाचे राज्य समर्थन मूल्य (एमएसपी) जाहीर करण्यात अपशयी ठरलेल्या राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

खासदार गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपले जवळपास ८० टक्के ऊस पिक साखर कारखान्यांना पुरविले आहे. मात्र, सरकार अद्याप एसएपी जाहीर करण्यात अपयशी ठरले आहे.

गांधी म्हणाले की, १० बड्या उद्योगपतींनी बँकांचे २.७० लाख कोटी रुपये थकवले आहेत, ही मोठी दुर्दैवी बाब आहे. गांधी पुढे म्हणाले की, भगवान श्री रामांनी आपल्या आसपासच्या कमजोर घटकांची सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारली होती. मी भगवान श्रीराम नाही. मात्र, संकटाचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे ठामपणे उभा राहील असा संकल्प करीत आहे. धर्म लोकांना गरीबांची मदत करणे आणि महिलांचा सन्मान करण्यासाठी प्रोत्साहन देतो. ते पुढे म्हणाले की, देशातील लोकांना धर्मावर आधारित राजकीय हितसंबंधांसाठी त्यांची जातीनिहाय विभागणी करण्यात आली आहे. जेव्हा शेतकरी सुखी होईल, तेव्हाच देश सुखी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here