शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा साखर कारखान्यांकडे प्रस्ताव

पुणे : साखर कारखान्यांनी ऊस बिलातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करावी अशी विनंती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (एमएसईडीसीएल) केली आहे.

याबाबत इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि एमएसईडीसीएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात ऑनलाईन बैठक झाली. यावेळी साखर कारखानदारांनी जर वीज बिल वसुली करून दिल्यास त्यांना १० टक्के रक्कम बक्षीस दिली जाईल असे सांगण्यात आले. २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी एकरकमी योजना लागू केली होती.

अलिकडेच झालेल्या बैठकीवेळी सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या जिल्ह्यांत जवळपास १२ लाख शेतकऱ्यांकडे १०,००० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, साखर कारखानदारांनी या योजनेवर आक्षेप घेतला आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या सोलाापूर जिल्ह्यातील एका सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी एफआरपीमध्ये कोणतीही कपात करणे शक्य नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here