सलग १२ वेळा मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : फोर्ब्सने सन २०१९ साठीची भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानी सलग १२ वेळा पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर अदाणी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांनी उत्तुंग झेप घेत थेट दुसरे स्थान पटकावले आहे. हे वर्ष देशाच्या श्रीमंतांसाठी खूप आव्हानात्मक राहिले. तरीही मुकेश अंबानी लागोपाठ १२ वेळा फोर्ब्सच्या यादीत श्रीमंत व्यक्ती म्हणून टॉप वर राहिले आहेत. त्यांनी जिओच्या मदतीने ४१० कोटी आपल्या संपत्तीत जोडले आहेत. जिओ ही ३ वर्षांपूर्वीची टेलीकॉम कंपनी आहे, तिच्या ग्राहकांची संख्या ३४ कोटींपेक्षा अधिक आहे.

फोर्ब्सच्या यादीत दुसऱ्या स्थानावर इन्फ्रास्ट्रक्चर टायकून गौतम अदानी आहे. गौतम अदानी ८ स्थानांची उसळी मारून दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. तर उदय कोटक ४०० डॉलरच्या मदतीने पहिल्यांदा टॉप ५ मध्ये पोहचले आहेत. या वर्षी फोर्ब्सच्या यादीत ६ नवीन चेहरे सामील झाले आहेत. यात बायजू अॅपचा फाउंडर बायजू रविंद्रन यांचाही समावेश आहे.

मुकेश अंबानी लगोपाठ १२ वेळा फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत (भारतीय) अग्रस्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५१४० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १५७० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती १५६० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  पैल्लोंजी मिस्त्री यांचे नाव या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १५०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे.  यादीत पाचव्या स्थानावर एशियातील सर्वात मोठे बँकर उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४८० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  शिव नादर १४४० कोटी अमेरिकन डॉलरच्या एकूण संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावर राधाकृष्ण दमानी यांचे नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती १४३० कोटी अमेरिकन ड़ॉलर आहे.  गोदरेज परिवार आठव्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १२०० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  लक्ष्मी मित्तल यांचे नाव ९ व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती १०५० कोटी अमेरिकन डॉलर आहे.  १० व्या स्थानावर कुमार बिर्ला आहे. त्यांची एकूण संपत्ती ९६० कोटी अमेरिकन डॉलर आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here