टॉप टेन श्रीमंतांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांचा समावेश

91

मुकेश अंबानी यांचा पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या टॉप 10 यादीमध्ये समावेश झाला आहे. गेल्या शनिवारी ते या यादीतून बाहेर जावून 12 व्या स्थानावर पोचले होते. फोर्ब्ज रियल टाइम बिलियनेयर इंडेक्स नुसार बुधवारी सकाळपर्यंत मुकेेश अंबानी 77.1 अरब डॉलर च्या नेटवर्थ सह 9 व्या स्थानावर होते. यादीमध्ये सर्वात वर अ‍ॅमेझॉन चे ओनर जेफ बेजोस 181.5 अरब डॉलर च्या नेटवर्थसह टॉप वर आहेत.

दहाव्या स्थानावर सर्गी ब्रिन आहेत. आठव्या स्थानावर लैरी पेज आहेत. वॉरेन बफेट सहाव्या आणि मार्क जुकेरबर्ग चौथ्या स्थानावर आहेत. अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस पहिल्या स्थानावर आहेत. दुसर्‍यावर बनॉर्ड अ‍ॅन्ड फॅमिली आहेत. तिसर्‍यावर एलन मस्क आणि चौथ्या स्थानावर बिलगेटस आहेत. टॉप 10 च्या यादीमध्ये अधिकतर अमेरिकी उद्योजक आहेत. दरम्यान जेफ बेजोस च्या नेटवर्थ मध्ये 3.9 अरब डॉलर, टेस्ला च्या एलन मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 8.9 अरब डॉलर, फेसबुक चे सीईआ मार्क जुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्ये 2 अरब डॉलर लैरी पेज यांच्या संपत्तीमध्ये 1.3 बिलियन डॉलर ची कमी नोंदवण्यात आली आहे.

तर ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये 8 ऑगस्टला मुकेश अंबानी यांना श्रीमंत उद्योजकांच्या रँकिंगमध्ये चौथे स्थान मिळाले होते. यावर्षी 14 जुलै ला मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत लोकेांच्या सूचीमध्ये सहाव्या नंबरावर पोचले होते, तर 23 जुलै ला जगातील पाचवे सर्वात श्रीमंत मनुष्य बनले होते.

फोर्ब्स च्या रियल टाइम बिलियनेयर रैकिंग्स मुळे प्रत्येक दिवशी पब्लिक होल्डिंग्स मध्ये होणार्‍या चढउतारा बाबतीत माहिती मिळते. जगातील वेगवेगळ्या भागात शेअर बाजार खुला झाल्यानंतर प्रत्येक 5 मिनिटामध्ये हा इंडेक्स अपडेट होतो. ज्या व्यक्तींची संपत्ती कोेणत्याही खाजगी कंपनीशी संबंधीत आहे, त्यांचा नेटवर्थ दिवसात एकदाच अपडेट होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here