ब्रँड गार्डियनशीप इंडेक्स : मुकेश अंबानी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सीईओंपेक्षा मागे टाकून द्वितीय क्रमांकावर

आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या छोट्या मुलाचा साखरपुडा नुकताच झाला. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन  Brand Guardianship Index २०२३ मध्ये भारतात पहिल्या आणि जगात द्वितीय स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे. ब्रँड फायनान्सद्वारे हा इंडेक्स तयार केला जातो. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स सीईओला जागतिक मान्यता असते. ब्रँड फायनान्सने सांगितले की, आम्ही एक संतुलीत निर्देशांक तयार केला आहे. यातून कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सीईओंची कार्यक्षमता, दीर्घकालीन स्तरावर शेअर मूल्य पुढे नेण्यात त्यांची भूमिका याचे आकलन करण्यात आले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रँड फायनान्स इंडेक्समध्ये रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांना ८१.७ चा बीजीआर स्कोअर मिळाला आहे. हा अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज के. जेन्सेन हुआंग यांच्यानंतरचा आहे. त्यांचा स्कोअर ८३ आहे. हुआंग जगात पहिल्या क्रमांकावर आहे. १००० मार्केट अॅनालिस्टकडून केलेल्या सर्व्हेतून हा इंडेक्स तयार केला आहे. या यादीतील टॉप १० मध्ये अॅडोबचे शंतनू नारायण हे चौथ्या, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई पाचव्या तर डेलायचे पुनीत राजन सहाव्या क्रमांकावर आहेत. टाटा ग्रुपचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन आठव्या क्रमांकावर आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा २३ व्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here