नवी दिल्ली : मुंबईत गुरुवारी पेट्रोलच्या किमतीने १०३.८९ रुपये प्रती लिटरचा उच्चांक प्रस्थापित केला. गुरुवारी पेट्रोलच्या दरात २६ पैसे वाढ झाली तर डिझेलचा दर प्रती लिटर ९५.७९ रुपये प्रती लिटरवर पोहोचला. नवी दिल्लीत पेट्रोल २६ पैशांनी वाढून आता ९७.५० रुपये प्रती लिटर तर डिझेल ७ पैशांनी वाढून ८८.३० रुपये प्रती लिटरवर पोहोचले. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे ९८.८८ रुपये आणि ९२.८९ रुपये प्रती लिटरवर पोहोचला. तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ९७.६३ आणि ९१.१५ रुपये प्रती लिटर झाली.
देशभरात सातत्याने इंधन दरात वाढ होत असून व्हॅटच्या आधारावर प्रत्येक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत. देशभरात सातत्याने दरवाढ झाली असून काही राज्यांमध्ये हा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान, काँग्रेसने वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे नेते इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात आंदोलनाची तयारी करीत आहेत. अलीकडेच काँग्रेसने पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात देशव्यापी आंदोलने केली आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link