अतिवृष्टीमुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतुक १६ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक पावसामुळे पूर्णपणे ठप्प आहे. १६ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. मध्य रेल्वेच्या इतिहासात पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक तब्बल १२ दिवस बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय लांब अंतराच्या दिडशे गाडय़ा रद्द केल्या आहेत.

यंदा जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये पावसाने चांगलाच हाहाकार माजवला. मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी झालेल्या संततधार पावसामुळे घाटात मालगाडीचे डबे घसरले. मंकी हिल, ठाकूरवाडी भागात दरडी कोसळल्यामुळे घाटातील दुरुस्तीसाठी पुणे-मुंबई प्रगती, डेक्कन एक्स्प्रेससह पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या, या दरम्यान जोरदार पाऊस सुरू झाल्याने पुणे-मुंबई दरम्यान सर्वच गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत विभागात लोहमार्गावरून पाणी गेले. सिग्नल यंत्रणा ढासळली आणि दरडी ही कोसळू लागल्या. त्यामुळे रेल्वेने ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून पुणे-मुंबई दरम्यानच्या सर्व गाडय़ा बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर केले.

सध्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी, इंटरसिटी, सिंहगड, प्रगती, डेक्कन एक्स्प्रेस आदी सर्वच गाडय़ा बंद आहेत. कोयना, सह्यद्री एक्स्पेसही १६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वेचा १२ दिवसाचा बंदचा कालावधी ऐतिहासिक ठरला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here