मुंबई: मॉलमध्ये एन्ट्री पूर्वी रॅपिड अँटिजेन टेस्ट, बीएमसीचा मोठा निर्णय

89

मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. मुंबईतील लोकांना आता मॉलमध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्याना कोरोना टेस्ट करून घ्यावी लागेल. मुंबईतील सर्व मॉलमध्ये कोरोनाची टेस्ट घेण्याचे सॅम्पल देण्यासाठी रॅपीड अँटिजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले की, वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. २२ मार्चपासून सर्व मॉलसाठी स्वॅब जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असेल. त्यासाठी एक टीम प्रवेशद्वारावर तैनात केली जाईल.

याशिवाय, महाराष्ट्र सरकारने ३१ मार्चपर्यंतच्या नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व चित्रपटगृहे आणि सभागृहांत प्रवेश क्षमतेच्या ५० टक्केच माणसे असतील. याशिवाय मास्क नसलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. तर खासगी कार्यालयांमध्येही ५० टक्के उपस्थिती असेल.

याशिवाय बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, लक्षणे असलेल्या व्यक्तींना थेटपणे ओळखणे मुश्किल आहे. अशी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी आली तर संक्रमणाची भीती वाढते. नागरिकांना मॉलमधील एन्ट्री पूर्वी एकतर कोरोनाचे निगेटिव्ह सर्टिफिकेट दाखवावे लागेल अथवा टेस्ट करून घेण्यासाठी तयार व्हावे लागेल असे सुरेश काकानी यांनी सांगितले.
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मॉल्सच्या मालकांसोबत चर्चा केली होती. राज्यातील वाढत्या कोरोनाला लॉकडाउन हा पर्याय नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here