मुजफ्फरनगर : आधुनिक पद्धतीने ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

चरथावल : नव्याने गुंतवणूक करताना कमी खर्चात चांगले उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करण्यात माहीर असलेले शेतकरी विभागासाठी आदर्श ठरले आहेत. वाढाई कलान येथील प्रगतशील शेतकरी अरविंद मलिक यांनी रोप लागवड पद्धतीने आणि लुहारी खुर्द येथील लजपत सैनी यांनी बडचिप पद्धतीने संपूर्ण जमिनीत नवीन जातीच्या उसाची लागवड केली आहे. आंतरपीक घेत शेतीच्या बदलत्या पद्धतींसह नवीन बियाणांची लागवड करून चांगले उत्पादन घेता येऊ शकते, असा या दोन्ही शेतकऱ्यांचा विश्वास आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नव्या पद्धतीने शेती करणे, त्यामध्ये नवनवे प्रयोग करणे ही अरविंद मलिक यांची खासीयत आहे. त्यांनी बियाणे तयार करून आपल्या शेतात ऊस लागवड केली. गेल्या महिन्यात त्यांनी रोपे तयार केली. हरभरा हे आंतरपिक त्यांनी घेतले. त्यांनी १४२०१, १५२३३, १३२३३ आणि १८८ या प्रजातीच्या बियाण्यांची लागवड केली आहे. पूरक पिके घेताना ऊसाच्या ८० ते १०० क्विंटल उत्पादनासह एक क्विंटल हरभऱ्याचे सहज उत्पन्न मिळते असा अनुभव मलिक यांचा आहे. ऊस बियाणे आणि पाणी यांचा वापर नव्या पद्धतीने ७५ टक्के घटतो. किटकनाशकांचा खर्च कमी येतो. यासोबतच पूरक पिकांमुळे जमिनीची ताकद वाढते. त्यातून खोडवा ऊस पिक अनेक वर्षे घेता येते असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here