शेतात ऊस असेपर्यंत सुरु रहावा साखर कारखाना : राकेश टिकैत

मुजफ्फरनगर : आइपीएल साखर कारखान्यात ऊस घालण्यासाठी जमलेल्या गर्दीतील शेतकऱ्यांना भेटून भाकियू चे राष्ट्रीय प्रवक्ता यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या संपूर्ण ऊस घेउन झाल्यानंतर कारखाना बंद करा, अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाकडे केली.

आइपीएल साखर कारखान्यामध्ये गुरुवारी भाकियू राष्ट्रीय प्रवक्ता चौधरी राकेश टिकैत यांनी ,आपल्या समर्थकांसह कारखाना स्थळावर पोचून स्थळाचा दौरा केला. यामुळे कारखाना व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. राकेश टिकैत यांनी कारखान्यात ऊस घालण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच त्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी कारखाना व्यवस्थापनाकडे केली. टिकैत यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतात ऊस बाकी आहे तोपर्यंत कारखाना चालू रहावा. संपूर्ण ऊस गाळपानंतरच कारखाना बंद केला जावा. त्यांनी व्यवस्थापनाला इशारा दिला की, शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारे केले जाणारे शोषण सहन केले जाणार नाही. जर कारखाना प्रशासनाने पूर्ण ऊस न घेता कारखाना बंद तर व्यवस्थापनाने आरपार च्या लढाई साठी तयार रहावे. शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनावर आरोप केला की, साखर कारखान्याचे अधिकारी टैक्टर-ट्राली तून ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना टोकन बनवून देत नाहीत. यामुळे स्टेट हायवे वर ऊस भरलेल्या वाहनांची रांग लागते आणि यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

याप्रसंगी संजीव भारद्वाज, सतीश भारद्वाज, दुष्यन्त बहेडी, आशु मलिक, संजू त्यागी, अलाहु त्यागी, राजू त्यागी, दुष्यंत, बॉबी त्यागी आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here