मवाना साखर कारखान्याकडून हंगाम समाप्तीसाठी नोटीस जारी

मेरठ : मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये दहा मे २०२३ पर्यंत जवळपास २०८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. साखर कारखान्याकडून गळीत हंगामात सुरू करण्यात आलेल्या १६१ ऊस खरेदी केंद्रांपैकी ११४ खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखाना प्रशासनाने कमी ऊस उपलब्ध होत असल्याने आता आपला गळीत हंगाम २०२२-२३ समाप्तीच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत साखर कारखान्याने ११ मे रोजी दुसरी नोटीस जारी केली आहे. पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करु शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेकदा कारखान्याला नो केन स्थितीला सामोरे जावे लागत आहे. कारखान्याने कमी ऊस उपलब्धतेमुळे १२ मे रोजी दुसरी नोटीस दिली आहे. पुरेसा ऊस मिळत नसलेली खरेदी केंद्रे बंद केली जातील, असे यात म्हटले आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऊस पाठवावा. अन्यथा कारखाना गाळप बंद करू शकतो असे कारखान्याचे ऊस विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here