मवाना साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना २५.५९ कोटींची ऊस बिले अदा

मवाना : मवाना साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मधील २४ एप्रिल २०२२ पर्यंतची २५.५९ कोटी रुपयांची ऊस बिले संबंधित समित्यांना पाठवली आहेत. मवाना कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना ६१७.९८ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. आता फक्त २४ दिवसांची ऊस बिले शिल्लक राहिली आहे. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना थकबाकी ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्णपणे दिली जाईल, असा दावा कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे ऊस तथा प्रशासन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, साखर कारखाना आणि ऊस समित्यांच्या माध्यमातून ऊस नोंदणीच्या सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरू आहे. कारखान्याकडून सध्या २० टक्के सवलतीच्या दरात ऊसावरील किटकनाशक आणि युरियाची फवारणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये किटकनाशक तथा खताची फवारणी करायची असेल, त्यांनी कर्मचाऱ्यांकडे नावनोंदणी करावी. यासोबतच टॉप बोरर किडीला आळा घालण्यासाठी कोराजनचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here