म्यानमार हंगाम २०२३-२४ मध्ये व्हिएतनामला करणार १०,००० टन साखर निर्यात

हनोई : ऊस गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित एकूण १०,००० टन साखर व्हिएतनामला निर्यात केली जाईल असे म्यानमार शुगर अँड केन रिलेटेड प्रॉडक्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष यु विन हते यांनी सांगितले. व्हिएतनामने हंगाम २०२३-२४ मध्ये म्यानमारकडून १०,००० टन साखर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. आता दोन्ही देशांकडून साखरेच्या किमती आणि साखर उत्पादन आणि शिपमेंटचा योग्य कालावधी याबाबत बोलणी सुरू आहेत. देशभरात सुमारे ४,५०,००० ते ५,००,००० एकर जमिनीवर उसाची लागवड केली जाते. यापासून वार्षिक ५,००,००० टन साखरेचे उत्पादन होते.

ते म्हणाले, डिसेंबरमध्ये हंगाम असल्याने आम्ही २०२३-२०२४ च्या नवीन ऊस हंगामात विक्री करू शकतो. सध्या आम्ही साखरेच्या स्थानिक वापराला प्राधान्य देतो. विविध देशांतून ऊस आणि साखरेची मागणी आली असली, तरी स्थानिक उत्पादन दर आणि वापर लक्षात घेऊन त्याची निर्यात व्हिएतनामलाच निर्यात केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here