मंड्या : ‘कर्नाटकातील ऐतिहासिक म्हैसूर शुगर कंपनी लिमिटेड कारखान्याची मालकी सरकारकडेच राहीली पाहिजे’ अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे गटनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडली. त्यांनी मंड्या येथे शेतकरी संरक्षण समितीने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री बोलत होते.
“कर्नाटकात एकूण ६५ कारखाने आहेत. त्यापैकी म्हैसूर साखर कारखाना हा एकमेव सरकारच्या मालकीचा आहे. त्यामुळे कारखान्याचे खासगीकरण करण्याऐवजी तो राज्य सरकारच्या ताब्यात राहीला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. साखर कारखान्याच्या नुकसानीसाठी शेतकरी नव्हे तर राज्य सरकारच जबाबदार आहे. कारखान्याच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारीही सरकारची आहे,” असे सिद्धरामय्या म्हणाले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘राज्य सरकारच्या मालकीचे कारखाने आणि कंपन्या सध्या नुकसानीत आहेत. सरकारने हे नुकसान का होत आहे? याचा शोध घेतला पाहिजे. कारखान्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.’ सिद्धरामय्या यांनी माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्यावर टीका केली. जर म्हैसूर आणि मंड्यातील खासगी साखर कारखाने नफा मिळवू शकतात, मग एक सरकारी कारखाना का नफा मिळवू शकत नाही अशी विचारणा त्यांनी केली. ‘येडियुराप्पा मंड्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ते या कारखान्याचा विकास करतील असे मला वाटले होते. मात्र, त्यांनी आपल्या कार्यकाळात खासगीकरणाला गती दिली’ अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link