मंत्र्यांनी सांगितले मायशुगर फॅक्ट्रीचे खाजगीकरण होणार नाही

148

मंड्या : मांड्या मध्ये मायशुगर फ्रक्ट्रीचे खाजगीकरण होणार नाही, असे सांगून सरकार क्षेत्रातील लोकांच्या भावनांचा विचार करुन कारखाना चालवेल, असे साखर आणि श्रम मंत्री शिवराम हेब्बार यांनी सांगितले. बुधवारी फैक्ट्री चे निरिक्षण केल्यानंतर मंत्री हेब्बार यांनी सांगितले की, मायशुगर फैक्ट्री मंड्या जिल्ह्याचा गौरव आहे. कारखाना राज्य सरकारकडून किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत चालवला जाईल.

मंत्री शिवराम हेब्बार यांनी सांगितले की, राज्य सरसकारने कारखान्याला पुन्हा सुरु करण्यासाठी 22 करोड रुपये जारी केले आहेत. आता सरकारकडून अनेक उपाय केले जातील जेणेकरुन भविष्यात उसाच्या गाळपासाठी कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी सांगितले की, मायशुगर फैक्ट्री सर्वांचा गौरव आहे आणि फैक्ट्री वाचवणे आम्हा सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे. ते पुढे म्हणाले, डिप्टी कमिश्‍नर यांना फैक्ट्री च्या संपत्तीचा पूर्ण आढावा तयार करणे आणि अडथळ्याविना फैक्ट्री चालवण्यासाठी आवश्यक निधीचा अंदाज घेण्यास सांगितले आहे.

मंड्या जिल्ह्याचे मंत्री के.सी. नारायणगौडा यांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या खूप विरोधानंतर सरकारला मायशुगर खाजगीकरण योजना सोडावी लागली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here