नाफेड आणि ‘एनसीसीएफ’कडून डाळी, मक्याच्या उत्पादनाला चालना; आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ अंतर्गत देशातील डाळी आणि मक्याचे उत्पादन वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमात नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) यांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, दोन्ही सहकारी संस्था शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच सहकारी पद्धतीची खरेदी व्यवस्था अधिक सक्षम करत आहेत. या उपक्रमाचा उद्देश तूर, उडीद आणि मसूर यांचे उत्पादन वाढवून डाळींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. त्याचबरोबर देशाच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला चालना देण्यासाठी मक्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

लाखो शेतकरी डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले

ChiniMandi WhatsApp Channel

सहकार मंत्रालयाच्या माहितीनुसार, एनसीसीएफच्या ‘ई-सम्युक्ती’ पोर्टलवर ४४.०९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर नाफेडच्या ‘ई-समृद्धी’ पोर्टलवर १५.८४ लाखांहून अधिक शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत. मोठ्या संख्येने होत असलेली ही नोंदणी शेतकऱ्यांना संघटित खरेदी व्यवस्थेशी जोडण्यात या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांची वाढती भूमिका अधोरेखित करते.

‘एमएसपी’वर हमीभावाने खरेदीची व्यवस्था

नाफेड आणि एनसीसीएफ त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि खरेदी नेटवर्कच्या माध्यमातून अशी व्यवस्था उभी करत आहेत, ज्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दराने हमी खरेदी मिळू शकते.यामुळे शेतकऱ्यांना पीक बाजारात आणण्यापूर्वीच बाजारपेठ आणि दराबाबत अधिक निश्चितता मिळते. मात्र, शेतकऱ्यांना केवळ एमएसपीवरच माल विकणे बंधनकारक नाही. मंत्रालयाच्या माहितीनुसार, बाजारातील दर एमएसपीपेक्षा अधिक असल्यास शेतकरी आपला माल खुल्या बाजारात विकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील चांगल्या दराचा फायदा घेता येतो आणि त्याचवेळी हमी खरेदीची सुरक्षितताही कायम राहते.

भारतासाठी डाळींचे उत्पादन वाढविणे महत्त्वाचे आहे. देशांतर्गत डाळींची उपलब्धता वाढवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे सरकारचे धोरण आहे.तूर, उडीद आणि मसूर यांची हमीभावाने खरेदी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी अधिक आत्मविश्वास मिळण्याची अपेक्षा आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here