ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी

326

कोपरगाव: नगरमधील मनमाड महामार्गावर ऊसाने भरलेला ट्रक कोपरगाव शहरालगत असलेल्या हॉटेल साई टुरिस्ट समोर उलटला. यात रस्त्याने जाणारे दोन पादचारी दबल्याने गंभीर जखमी झाले आहे. तर उडी मारल्याने चालकाचा जीव वाचला.

येथील के जे सोमय्या कॉलेजमध्ये पायथन या विषयाचे लेक्चर देण्यासाठी आलेल्या दोघेजण शनिवारी रात्री नागपूरला जाण्यासाठी बस स्टॅन्ड कडे जात असताना होटेल साई टुरिस्ट येवला नाका समोर नगर-मनमाड महामार्गाने ऊसाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना दुभाजकावर चढून पलटी झाल्यामुळे त्या ट्रक मधील उसाखाली जयेश गौतम व संतोष सेलोकर हे दोघे दबले गेले मात्र त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी तातडीने त्यांना बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव बचावला. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात संतोष याच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. घटनास्थळी शहरपोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली असून चालकास ताब्यात घेतले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here