नजीबाबाद : साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाची शेतकऱ्यांची मागणी

नांगलसोती : उत्तम साखर कारखान्याच्या विस्तारीकरणासह विविध मागण्यांबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाची भेट घेतली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर निकाली काढू असे आश्वासन दिले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बरकतपूर साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कारखान्यात येवून प्रशासनाची भेट घेतली. ब्रिज वीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य तांत्रिक महाव्यवस्थापक अतेंद्र शर्मा यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी, शेतकऱ्यांना खत खरेदीत सूट द्यावी, कॅनॉल रोडच्या कल्व्हर्टचे नूतनीकरण करावे, तिसोत्रा चौक ते कारखान्यापर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा आदी मागण्या मांडल्या. कारखान्याचे सहअध्यक्ष नरपत सिंग यांनी आगामी गळीत हंगामानंतर विस्तारीकरणाचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. तसेच गळीत हंगामासाठी ऊसाचा पूर्ण दर दिला जाईल असे ते म्हणाले. नजीबाबाद ऊस समितीचे अध्यक्ष ब्रिज कुमार, जितेंद्र सिंग, राकेश त्यागी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here