ऊस दरवाढ रोखल्याने राष्ट्रीय लोकदलाचे उत्तर प्रदेश सरकारवर टिकास्र

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये सलग तिसऱ्या वर्षी उसाच्या राज्य आधारभूत किंमतीमध्ये वाढ न केल्याबद्दल राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) राष्ट्रीय उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार ऊस दर वाढविण्याऐवजी कमी करू इच्छित आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला तसे करता आलेले नाही असा आरोपही जयंत चौधरी यांनी केला.

उत्तर प्रदेशमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत सन २०२०-२१ या गळीत हंगामात उसाचे दर जैसे थे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. याविरोधात जयंत चौधरी म्हणाले, सरकारने सलग तिसऱ्या वर्षी दरवाढ न केल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. उसाच्या वाढत्या उत्पादन खर्चाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. डिझेल, विज, युरियासह अन्य खते यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे ऊसाच्या एसएपीमध्ये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, सरकारने यंदाही शेतकऱ्यांना निराश केले आहे. सरकार यावर्षी एसएपी कमी करु इच्छित होते. मात्र, शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनांमुळे तसा निर्णय घेण्याची सरकारची हिंम्मत झालेली नाही असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here