बिहार निवडणूक: 125 जागां सह एनडीए ला बहुमत

नवी दिल्ली: बिहारमध्ये पुन्हा एकदा 125 जागा जिंकून एनडीए ने सत्ता मिळवली आहे, दुसरीकडे महाआघाडी ने काट्याचा मुकाबला करुन 110 जागांवर विजय मिळवला आहे. मतमोजणी मंगळवारपासून सुरु होती, बुधवारी पूर्ण झाली. या निवडणुकीत भाजपा : 74, जनता दल (यूनाइटेड) : 43, विआयपी : 4 आणि हिंदुस्थान आवाम पक्ष (धर्मनिरपेक्ष) यांना 4 जागा मिळाल्या. राजद आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी 110 जागा मिळवल्या आहेत. राजद 75 जांगांसह सर्वात मोठ्या पक्षाच्या रुपात समोर आली आहे, तर काँग्रेस ने मात्र 19 जागाच जिंकल्या. वामपंथी दलांनी 29 जागांवर निवडणुक लढवली होती, त्यापैकी 16 मध्ये त्यांनी आपला विजय नोंदवला, ज्यापैकी सीपीआइ (एमएल-लिबरेशन) यांनी त्यापैकी 12 जागा जिंकल्या. भाजपाचे मतदान 19.5 टक्के, जद (यू) चे 15.4 टक्के, राजद चे 23.1 टक्के आणि काँग्रेसचे 9.5 टक्के राहिले. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाजवळ केवळ जागा आहे. राज्यामध्ये एकूण 243 विधानसभा क्षेत्रा आहेत. आणि मैदानात 3,558 उमेदवार होते. ज्यामध्ये 370 महिला आणि एक ट्रान्सजेंडर व्यक्ती उमेदवार होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here