उसाच्या उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी पारंपारिक पद्धतींची नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याची गरज : रोशनलाल तमक

नवी दिल्ली : सध्या साखर उद्योग अनेक समस्यांना तोंड देत आहे. सध्याच्या साखर हंगामात मुख्य चिंतेची बाब म्हणजे ऊस पिकाची अचूक अंदाज बांधणी. याबाबत ‘चीनीमंडी’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, डीसीएम श्रीराम लिमिटेडचे सीईओ (साखर व्यवसाय) आणि कार्यकारी संचालक तसेच उत्तर प्रदेश शुगर मिल्स असोसिएशन (UPSMA) चे अध्यक्ष रोशन लाल तमक यांनी साखर उद्योगासमोरील आव्हानांचा उहापोह केला. देशातील साखर उत्पादनाच्या अंदाजात अचूकता येण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत.

Q1. आज साखर उद्योगासमोरील प्रमुख आव्हाने कोणती आहेत?

उत्तर : माझ्या मते, ऊस उत्पादनात शाश्वतता आणि हवामानाशी संबंधित समस्यांमुळे मोठी तफावत आहे. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करणे हे भागधारकांसमोर आव्हान आहे. ऊस उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी कोणतेही सिद्ध तंत्र नसल्यामुळे हे आणखी गुंतागुंतीचे बनते. या क्षेत्राची अंदाजे आर्थिक व्यवहार्यता हे दुसरे आव्हान आहे. कारण उसाची किंमत आणि साखरेची किंमत यांच्यात कोणताही परस्परसंबंध / समानता नाही. आमच्याकडे उसाची किंमत जास्त आहे, तर साखरेची किंमत कमी आहे. खरेतर, मजुरांच्या कमतरतेमुळे शेतीच्या कामांसाठी यांत्रिकीकरण अपरिहार्य आहे. तथापि, भारतातील बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे यांत्रिककरणाद्वारे उत्पादकता वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे.

Q2. साखर उत्पादनाचा अचूक अंदाज घेण्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा विचार केला पाहिजे?

उत्तर : हा गुंतागुंतीचा मुद्दा तपशीलवार समजून घेण्याची गरज आहे. साखर उत्पादनासाठी ७ प्रमुख घटक आहेत.

– उसाचे शेत
– विविधतेनुसार क्षेत्र
– उसाचे उत्पादन
– रिकवरीचे प्रमाण
– खांडसरी/गुळ उत्पादनाचे प्रमाण
– उसाचा बियाणे आणि अन्य कारणांसाठी वापर
– उसाचा इथेनॉलसाठी होणारा वापर

या घटकांपैकी उसाखालील लागवड क्षेत्राचा वाजवी अंदाज बांधता येतो. कारण कारखान्यांद्वारे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जात आहे आणि काही राज्यांमध्ये सहकारी ऊस संघाचे कर्मचारी संयुक्तपणे सर्वेक्षण करत आहेत. आता उत्तर प्रदेशसारख्या अनेक राज्यांमध्ये शेतांचे जिओ-फेन्सिंग केले जात आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाद्वारे ऊस क्षेत्राची अचूकता साधली जाऊ शकते.

बियाणे आणि विविध उद्देशांसाठी वापर जवळजवळ मानक आहे. कारण रोपांची पीक क्षेत्राच्या आधारावर गणना केली जाऊ शकते. तथापि, योग्य प्रमाणात इनपुट आणि आउटपुट मिळविण्यासाठी खांडसरी युनिट्सना नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. मुख्य घटक म्हणजे रिकवरी आणि ऊस उत्पादकता. नवीन तंत्रज्ञान वापरून त्याचा निश्चित अंदाज बांधला जाऊ शकतो.

पारंपारिक मार्ग : आपल्या देशाचे १५ कृषी-हवामान झोनमध्ये वर्गीकरण केले गेले आहे, जे कृषी पद्धतींचे मार्गदर्शन करण्यासाठी हवामान, माती आणि स्थलाकृतिमधील विशिष्ट स्थानिक फरक विचारात घेण्यासाठी आणखी ७२ एकसंघ उप-झोनमध्ये विभागले गेले आहेत.

प्रमुख ऊस उत्पादक क्षेत्रांवर आधारित, ५ कृषी-हवामान झोन आहेत. पहिली पायरी म्हणून, ऊस पिकवणारा प्रदेश या ७२ उप-प्रदेशांच्या आधारे मॅप केला जाऊ शकतो. विशेषत: द्वीपकल्पीय प्रदेशात, विशेषत: तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटक, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र या भागातील हवामानाच्या मापदंडांमधील प्रचंड फरक लक्षात घेता, उपप्रदेशांची प्रासंगिकता महत्त्वाची आहे. या उप-झोनमधील पिकाचे प्रकार आणि विविधता यांबाबत फॅक्टरी फार्म्स, संशोधन फार्म इत्यादी ठिकाणी पीक उत्पादन निश्चित करण्यासाठी वाढीची निरीक्षणे नोंदवावीत. याशिवाय आपल्याला मानक संचालन प्रक्रियांनुसार, साखर उताऱ्याचे अनुमान अथवा साखर उताऱ्यासाठी उसाच्या गुण व ऊसाच्या गुणवत्तेबद्दल अंदाज घेण्यासाठी ब्रिक्स, शुद्धता, फायबर इत्यादी मापदंडांवर उसाच्या रसाचे विश्लेषण करावे लागेल.

नवीन युगाचे तंत्रज्ञान (एआय/एमएल) : प्रत्येक शेतकऱ्याने पिकवलेले क्षेत्र अचूकपणे कॅप्चर करण्यासाठी भौगोलिक-स्थान मॅपिंग वापरणे, एआय आणि प्रतिमा प्रक्रिया वापरून शेताच्या सीमांची अचूकता सुधारणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, रिमोट सेन्सिंग/उपग्रह प्रतिमांचा वापर पिकाच्या वाढीचे सतत मोजमाप करण्यासाठी केला जाऊ शकतो.

Q3. सध्या विविध प्रकारच्या घडामोडींवर बरेच संशोधन चालू आहे. यूपीमध्ये साखर उत्पादन सुधारणारी उसाची Co ०२३८ ही प्रजाती विविध रोगांना बळी पडत आहे. आपण ऊस उत्पादन सुधारण्यासाठी विकसित होत असलेल्या उसाच्या जातींबद्दल माहिती देऊ शकाल का?

उत्तर : ऊस प्रजनन संस्थांनी काही चांगल्या प्रजाती विकसित केल्या आहेत, ज्या उपोष्णकटिबंधीय प्रदेशांसाठी रिकवारीच्या दृष्टीने चांगल्या आहेत. त्यामध्ये CoLk १४२०१, Co १५०२३, Co ०११८, CoS १३२३५ आदींचा समावेश होतो. उष्णकटिबंधीय प्रदेशांसाठी, Co ८६०३२ आणि Co ९२००५ च्या विद्यमान वाणांव्यतिरिक्त, Co ११०१५, Co १४०१२ यांसारख्या नवीन जाती आशादायक दिसतात. या जातींच्या प्रचारासाठी सरकारी विभाग आणि साखर कारखानदार कार्यरत आहेत.

Q4. आपल्या व्यवसायाच्या धोरणामध्ये स्थिरतेचा समावेश केल्याने आपल्या कंपनीचा दीर्घकालीन फायदा कसा होतो?

उत्तर : डीसीएम श्रीराम लिमिटेडमध्ये, आम्ही आमच्या व्यवसाय ऑपरेशन्सच्या सर्व पैलूंमध्ये शाश्वतता समाकलित करण्याचा प्रयत्न करतो. ज्यामध्ये ऊस मूल्य साखळी आणि कारखान्यातील कार्ये यांचा समावेश होतो. आमचा मुख्य फोकस असलेल्या क्षेत्रांमध्ये मृदा आरोग्य सुधारणा, जलसंधारण, यांत्रिकीकरण आणि कारखान्यांमध्ये संसाधन वापर कार्यक्षमता वाढवणे समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत उल्लेखनीय परिणाम मिळाले आहेत. आमच्या कारखान्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाच वर्षांच्या कालावधीत ७५६ अब्ज लिटर पाण्याची बचत झाली आहे. भारतीय ऊस संशोधन संस्था लखनौ (IISR) द्वारे मान्यताप्राप्त असलेली ही उपलब्धी केवळ भूजल साठ्यावरील दबाव कमी करत नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक शाश्वत भविष्यासाठी पाया घालते. त्यांच्या शेतीच्या शक्यता वाढवते. आमच्या संस्थेतील शाश्वत पद्धतींची संस्कृती, आम्हाला आमच्या ग्राहकांमध्ये एक प्राधान्यक्रम देणारा पुरवठादार म्हणून स्थापित करते.

Q5. सरकार साखर उद्योगाला सीबीजी, ग्रीन हायड्रोजन इत्यादी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. डीसीएम श्रीराम या क्षेत्रांचा शोध घेण्याच्या विचार करीत आहे का? तुम्ही तुमच्या कंपनीच्या योजना शेअर करू शकता का?

उत्तर: आम्ही आधीच CBG क्षेत्रात पूल टाकले आहे आणि ऑक्टोबर २०२४ पर्यंत आमचा पहिला प्लांट सुरू करू. या क्षेत्रात आणखी विस्तार करण्याची आमची योजना आहे. याव्यतिरिक्त, आम्ही इतर संधीदेखील शोधत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here