बंद साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत: जीतन राम मांझी

पाटणा : गेल्या तीन दशकांपासून बंद वारिसलीगंज साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा हम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले. ते म्हणाले की, मी वारिसलीगंजच्या शेतकऱ्यांच्यावतीने बिहार सरकारकडे ही मागणी करीत आहे. नवादा जिल्ह्यातील हा एकमेव उद्योग पुन्हा सुरू व्हावा. त्याचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. तरच या विभागातील शेतकरी, कामगार आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मांझी म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार गंगा नदीच्या उत्थानासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी गंगा नदीचे पाणी राजगीर, गया परिसरातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम झाले आहे. माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, वारिसलीगंजमधील शेतकऱ्यांची समृद्धी आणि कामगारांचे पलायन थांबविण्यासाठी कारखाना सुरू व्हायला हवा, असे मांझी म्हणाले. साखर कारखान्याला भंगारात विक्री काढण्याच्या विषयाबाबतही मांझी यांनी भाष्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here