इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाचा वापर करण्याची आवश्यकता : मुख्यमंत्री Y.S. Jagan Mohan Reddy

अमरावती : विशाखापट्टणम आणि श्रीकालहस्ती नोड्सच्या विकासावर लक्ष केंद्रीत करावे असे निर्देश आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी (Y.S. Jagan Mohan Reddy) यांनी बुधवारी उद्योग आणि पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक विभागाच्या (I&I) अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सर्वोतोपरी मदत केली जावी, ज्या उद्योगांच्या माध्यमातून राज्यातील स्थानिक उत्पादनांमध्ये (जीएसडीपी) पुरेसे योगदान दिले जाते आणि एमएसएमईला प्रोत्साहन देण्यासाठी जे उद्योग पात्र आहेत, अशांकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे.

जगन मोहन रेड्डी म्हणाले की, इथेनॉलच्या उत्पादनासाठी तांदळाचा वापर केला जाण्याची आवश्यकता आहे. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, हरित ऊर्जा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणे आणि राज्याची ऊर्जा सुरक्षा वाढविणारी योजना आहे. हरित हायड्रोजन, अमोनियाचे उत्पादन आणि जलविद्यूत सयंत्रांच्या स्थापनेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

राज्याने गेल्या तीन वर्षात औद्योगिक आघाडीवर वेगाने प्रगती केली आहे. यांदरम्यान, ९६ मेगा उद्योग आणि २८.२४७ एमएसएमई उद्योग उभारले गेले आहेत. यामध्ये केली गेलेली गुंतवणूक सुमारे ४७,४९१ कोटी आणि मिळालेल्या नोकऱ्यांची संख्या २,४८,१२२ इतकी आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना सांगितले की, देशात आणि जगभरात ९२ उद्योग राज्यात २,१९.७६६ कोटी रुपये गुंतवणूक करन आपले युनिट्स स्थापन करण्यास इच्छूक आहेत. मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांन औद्योगिक पार्कमधील प्रदूषण रोखण्यावर लक्ष देण्याचे आणि उद्योगांना, खास करून MSMEs ना याच्या निकषांचे पालन करणे आणि तंत्रज्ञान वाढीसाठी मदत करण्याचा सल्ला दिला. उद्योग तथा माहिती प्रसारण मंत्री गुडीवाड़ा अमरनाथ, विशेष मुख्य सचिव आर. करिकल वलावेन, उद्योग संचालक जी. श्रीजाना, एपीआयआयसीचे एमडी जे. व्ही. एन. सुब्रमण्यम, एपी मेरीटाइम बोर्डाचे अध्यक्ष के. व्यंकट रेड्डी आणि सीईओ शान मोहन आणि एपी ट्रेड प्रमोशन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष के. रविचंद्र रेड्डी आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here