नेपाळमध्ये कोका-कोला झिरो शुगरचे लाँचिंग

काठमांडू : कोका-कोला कंपनीने कोका-कोला झिरो शुगरचे लाँचिंग केले आहे. नेपाळम्ये कोका कोलाने कोका कोला झिरो शुगरला आणखी स्वादिष्ट आणि ताज्या रेसिपीसोबत बोल्ड आणि नव्या पॅकिंगमध्ये लाँच केले आहे.

याबाबत प्रसार माध्यमांसाठी जारी केलेल्या पत्रकानुसार, नेपाळचे ग्राहक आता शून्य साखरेसोबत कोका कोला झिरो शुगरचा आनंद घेऊ शकतात. इन हाऊस इनोव्हेशन आणि व्यापक बाजार परिक्षणानंतर कोका कोला झिरो शुगरला नवे, ताजे रुप मिळाले आहे. त्याला स्वादिष्ट चवही मिळाली आहे. कोका-कोलाच्या क्लासिक चवीसाठी कोक झिरोला २००५ मध्ये जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले होते. आणि त्यामध्ये २०१७ मध्ये सुधारणा करण्यात आली. आता कोका कोला झिरो शगर नेपाळमध्ये ५०० आणि २५० मिलीच्या पॅकमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here