नेपाळ: उस दर वाढवण्याच्या मागणीबाबत शेतकर्‍यांनी दिला आंदोलनाचा इशारा

काठमांडू: नेपाळ सरकारकडून उस दर वाढवण्याच्या मागणीबाबत उस शेतकर्‍यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकर्‍यांनी मागणी केली आहे की, उसच्या न्यूनतम मूल्यात वाढ व्हावी. उस उत्पादक संघ महासंघाचे अध्यक्ष कपिल मुनी मैनाली यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली आहे की, सरकारकडून या वर्षीही उसाचे समर्थन मूल्य तेच राहील. त्यांनी सांगितले की, कोरोना दरम्यान उत्पानात वाढलेल्या मूल्यामुळे शेतकरी आपल्या पीकांना कमी पैशात विकू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की, सवांंना माहित आहे की, साखरेच्या किमती वाढत आहेत, पण गेल्या तीन वर्षांपासून उसाच्या किमती अपरिवर्तित बनल्या आहेत.

कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षाच्या मूल्याला कायम ठेवण्याची शिफारस केली होती. कृषी मंत्रालयाचे प्रवक्ता हरी बहादुर केसी यांनी सांगितले की, उद्योग मंत्रालय कृषी मंत्रालयाकडून शिफारस केल्यानंतर कैबिनेटमध्ये प्रस्तावित न्यूनतम मूल्यावर चर्चा आणि बैठक घेईल. सरलाही मध्ये आयोजित उस उत्पादक महासंघाच्या बैठकीमध्ये यावर्षी उस 600 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीमध्ये न विकण्याचा निर्णय घेतला आहे. सरलाही, परसा, महतारी, रौतहट आणि दोन इतर जिल्ह्याच्या उस उत्पादक शेतकर्‍यांनीही 600 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी पैसे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या नुसार, आम्ही सरकारला एक निवेदन देणार आणि त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा करणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here