नेपाल: पाचव्या दिवशीही काठमांडूमध्ये शेतकऱ्यांचा विरोध कायम

काठमांडू: साखर कारखान्यांकडून प्रलंबित थकबाकीमुळे सरलाही येथून काठमांडू येथे आलेल्या ऊस शेतकऱ्यांनी गुरुवारी पाचव्या दिवशीही आपले विरोधी आंदोलन कायम ठेवले. रविवारी आंदोलन सुरु केलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पण आंदोलन केले आणि गुरुवारी मैत्रीघर मंडल मध्ये आंदोलन केले. रंगमंचावरील कलाकारांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती एकतेचे प्रदर्शन केले. सरकार शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवत आहे, शेतकऱ्यांनी सांगितले की, चर्चाला काही अर्थ नाही आणि आम्हाला फकत आमचे पैसे लवकर हवे आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये काठमांडू मध्ये या प्रकारचे आंदोलन करणारे शेतकरी रविवारी रस्त्यावर उतरून असे बोलू लागले की, सरकार आणि साखर कारखाना संचालक त्या पाच सूत्रीय कराराचे पालन करण्यात अपयशी राहिले, जे जानेवारी मध्ये थकबाकी संपवण्यासाठी करण्यात आला होता. आंदोलक शेतकरी जानेवारी मध्ये झालेला करार लागू करण्याची मागणी करत होते, ज्यामध्ये सरकारने आश्वासन दिले होते की, त्यांना तीन आठवड्याच्या आत पैसे भागवले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here