नेपाळ: ऊसाच्या तुटवड्यामळे साखर कारखाने बंद

91

बुटवल : पश्चिम नवलपरासी परिसरात गेल्या दशकात ३.२ लाख क्विंटल उसाचे उत्पादन केले जात होते. भरपूर ऊस उत्पादन असल्याने जिल्ह्यातील तीन साखर कारखाने सलग तीन महिने उसाचे गाळप आणि सरासरी २८८००० क्विंटल साखरेचे उत्पादन करीत होते. मात्र, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिले मिळण्यास होणारा उशीर आणि याप्रश्नी सरकारची उदासिनता यामुळे केवळ ऊस उत्पादक शेतकरीच नव्हे तर साखर उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळण्यास होणारा उशीर लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उसाची लागवड बंद केली. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने सध्या बंद आहेत.

बागमती साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात उसाचे गाळप सुरू केले होते. मात्र, पुरेसा ऊस उपलब्ध न झाल्याने एका आठवड्यातच कारखाना बंद करावा लागला. बहूतांश शेतकऱ्यांनी आपला ऊस भेली साखर कारखान्याकडे पाठवला. बागमती साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक टंकानाथ काफले यांनी सांगितले की, उसाच्या तुटवड्यामुळे साखर कारखाना सुरू ठेवणे अशक्य बनले आहे. कारखान्याची दररोजची गाळप क्षमता १५००० क्विंटलची आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत केवळ ४५००० क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. गेल्यावर्षी कारखान्याने ७०००० क्विंटल उसाचे गाळप केले होते. आमच्याकडे पुरेसा ऊस नसल्याने आम्ही तात्पुरत्या स्वरुपात कारखाना बंद करीत आहोत. जर पुर्ण क्षमतेने कारखाना सुरू राहीला नाही तर उत्पादन खर्च वाढतो. हे टाळण्यासाठी कारखाना बंद ठेवण्याचा पर्यायच योग्य ठरतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here