नेपाळ: प्रलंबित थकबाकी भागवण्यासाठी उस शेतकरी करणार आंदोलन

118

काठमांडू: साखर कारखाने पुन्हा एकदा थकबाकी भागवण्यामध्ये अपयशी ठरले आहेत, यासाठी सरलाही जिल्ह्यातील उस शेतकरी राजधानी काठमांडू मध्ये विरोध प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. सरलाही येथील उस शेतकर्‍यांच्या एका टीमने उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री लेखराज भट्ट यांच्याकडे दोन आठवड्यापूर्वी थकबाकी भागवण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी पूर्ण झाली नाही, यासाठी शेतकर्‍यांनी 12 डिसेंबरला विरोध प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला.

उस शेतकरी माया शंकर देव यांनी सांगतिले की, साखर कारखान्यांनी आश्‍वासन देवूनही थकाबाकी भागवलेली नाही. जितके शेतकरी जगण्यााठी उसावर निर्भर आहेत, त्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे कारण साखर कारखाने कायमच पैसे भागवण्यास विलंब करतात. यादव यांनी सांगितले की, शेतकर्‍यांची थकबाकी भागवणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार याबाबत गप्प आहे. यासाठी आम्ही 12 डिसेंबर ला आंदोलन करणार आहोत. उस शेतकरी सेघर्ष समितीचे संरक्षक राकेश मिश्रा यांच्या मतानुसार, आम्ही 2017-18 मध्ये उसाच्या कपात करणार्‍या निधीची मागी करुन एक अपील दाखल केले होते, पण सरकारने आमचे म्हणणे फेटाळून लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here