नेपाळ : ऊसाच्या दरात ८.३९ टक्के वाढ, आता प्रती क्विंटल ५९० रुपये दर

264

काठमांडू : सरकारने नोव्हेंबरपसून सुरू झालेल्या चालू हंगामासाठी ऊसाचा किमान समर्थन दर ८.३९ टक्के वाढवून ५९० रुपये (Nepalese Rupee) प्रती क्विंटल केला आहे. सरकारचे प्रवक्ते ज्ञानेंद्र बहादुर कार्की यांनी सांगितले की, बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी सरकारने ऊसाचा किमान दर ५४४.३३ रुपये प्रती क्विंटल निश्चित केला होता.

उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्रालयाच्या अव्वर सचिव उर्मिला केसी यांनी सांगितले की, ऊस दरात उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेले प्रती क्विंटल ७० रुपयांचे अनुदानही समाविष्ट आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेला हा उसाचा किमान दर आहे. हा दर कृषी आणि पशुधन विकास मंत्रालयाच्या शिफारशींवर आधारित पिकापूर्वी जाहीर केला जातो. यास आता दोन महिन्यांचा उशीर झाला आहे. याबाबत सरकारला ऊस उत्पादकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. शेतात पिक वाळत होते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात सातत्यपूर्ण सुरू राहणारा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी सरकारने २०१८ मध्ये उसाचा दर निश्चित करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार दरवर्षी उसाच्या किमान दरावरुन वादात सापडत होते. यापूर्वी नेपाळमधील ऊस दर हा भारतीय साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ऊस दरावर आधारीत होत्या. उसाचा किमान दर नोव्हेंबर महिन्यात निश्चित केला गेला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. गळीत हंगाम डिसेंबर महिन्यात सुरु करणे अपेक्षित आहे. देशात ऊस उत्पादनात २०१२ पासून सातत्याने घट येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here