मुंबईसाठी आयएमडीकडून नवा अलर्ट, जोरदार बरसणार पाऊस

47

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिवसभर मोठा पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पाणी साठले. लोकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ऑरेंज अलर्ट जारी केला होता. आता पुढील काही दिवस मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत आणखी पावसाची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी ढगाळ हवामान राहील. जोरदार पाऊस कोसळेल असे आयएमडीने म्हटले आहे. त्यामुळे लोकांनी त्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे अशी सूचना करण्यात आली आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत १७ सप्टेंबर रोजीही पावसाची शक्यता आहे. १८ व १९ सप्टेंबर रोजी हवामान ढगाळ राहील. हलका पाऊस कोसळेल. २० आणि २१ सप्टेंबर रोजी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईत आज, शुक्रवारी किमान तापमान २६ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान ३० डिग्री सेल्सिअस राहील. गुरुवारच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पाणी साठले होते. पुढील काही दिवस पावसाची अशीच स्थिती राहील असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here