सेंद्रिय साखरेचा नवा प्रयोग

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने सेंद्रीय साखरेचं उत्पादन चालू केलं आहे तसेच त्याची विक्री हि चालू केली आहे.

साखर खाणाऱ्या ग्राहकांमध्ये सध्या अतिशय गतीने आरोग्यविषयक जागृती होत आहे. सध्या भारतात होणाऱ्या गंधकयुक्त साखरेमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करता सेंद्रिय साखर ही गंधकयुक्त साखरेला चांगला पर्याय होऊ शकते.

सेंद्रिय साखर बनवण्याची प्राथमिक सुरवात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच त्यांना प्रोत्साहित करून सेंद्रिय शेती करण्याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन करण्यापर्यंत चा भाग येतो.

सेंद्रिय साखरेचे उत्पादन घेण्याकरिता त्याचा कच्चा माल म्हणजेच ऊस देखील सेंद्रिय पद्धतीने पिकवला जाणे आवश्यक आहे. या शेती मध्ये कोणत्याही पद्धतीचे रासायनिक पध्दतीचे खत वापरले जात नाही. या सेंद्रिय शेतीची अपेडा (APEDA) या केंद्रशानसानाच्या संस्थेकडे नोंदणी करून त्याच्या सेंद्रीयकरणाचे मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन संस्थेकडून योग्य ते ऑडिट करून सेंद्रिय शेतीबाबतचे सर्टिफिकेट दिले जाते. याच पद्धतीने सेंद्रिय साखर उत्पादन प्रक्रियाचेही ऑडिट होऊन याबाबतचे सर्टिफिकेट दिले जाते. कारखान्यास M/s.SGS India Pvt.Ltd.,  या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेकडून वरील दोन्ही सर्टिफिकेट मिळाले आहेत .

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि . शिरोळ या कारखान्याने आजवर केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आरोग्यदायी भविष्याचा वेध घेण्यासाठी दाखवलेली तत्परता याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा सेंद्रिय साखरेचा प्रयत्न होय .

अहवाला नुसार जागतिक सेंद्रिय साखरेच्या बाजारा मध्ये २०१७-२०२० पर्यंत १५.५५% नी वाढणार आहे. भारतात सेंद्रिय साखरेचे उत्पादन आणि वापर भविष्यात वाढण्याची शक्यता आहे

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here