जिल्हा बँकेच्या संचालक आमदारांचा सत्कार, जिल्ह्याच्या विकासासह साखर उद्योगाला उभारी देण्याचे अश्‍वासन

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ,राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजेश पाटील या संचालक आमदारांचा सत्कार खास. संजय मंडलिक यांच्या हस्ते गुरुवारी झाला. जिल्ह्याच्या विकासासह साखर उद्योगाला उभारी देण्याचे आश्‍वासन यावेळी नूतन आमदारांनी सत्काराला उत्तर देताना दिले.
सत्काराला उत्तर देताना आम. मुश्रीफ म्हणाले, महापूर आणि अतिवृष्टीने शेतकर्‍याला मोठा फटका बसला आहे. साखर कारखाने किती दिवस चालणार हे माहिती नाही? आम. राजेंद्र पाटील हे सत्तारुढ आघाडीसोबत असतील. त्यांनी सरकारकडून साखर उद्योगासाठी मोठे पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी आम. राजेश पाटील, आम. राजेंद्र पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यंदा प्रथमच सहा संचालक आमदार झाले. मी खासदार झालो. जिल्हा बँकेने शेतकर्‍याला आर्थिक बळ दिले. यापुढेही समन्वयाने काम करुया, असे आवाहन खास. संजय मंडलिक यांनी केले.
यावेळी बँकेचे संचालक भैया माने, संतोष पाटील, पी.जी. शिंदे, असिफ फरास, उदयादेवी साळुंखे, बाबासाहेब पाटील- असुर्लेकर, सर्जेराव पाटील, आर.के. पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here