पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या, काय आहे दर

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये आहे. तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून इंधन दरात बदल करण्यात आलेला नाही.

iocl.com वरील माहितीनुसार मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. येथे पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर तर डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. केंद्र आणि राज्य सरकारांकडून वसूल केल्या जाणाऱ्या टॅक्समुळे हे इंधन सर्वसामान्यांना महाग दराने मिळते. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर तर BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून माहिती मिळवू शकतात. तर HPCLचे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here