पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनदर

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये, मंगळवारी म्हणजे ११ जानेवारी रोजी कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात दररोज उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. असे बदल पाहायला मिळत असूनही गेल्या दोन महिन्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपेक्षा अधिक दराने मिळत आहे.

आयओसीएलकडील ताज्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपयांना मिळत आहे. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०० रुपयांवर आहे. येथे पेट्रोल १०१.४० रुपये प्रती लिटर तर डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.

याशिवाय युपीची राजधानी लखनौमध्ये पेट्रोल ९५.२८ रुपये तर डिझेल ८६.८० रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे.

दिल्लीनजीकच्या नोएडामध्ये पेट्रोल ९५.५१ रुपये तर डिझेल ९७.०१ रुपये प्रती लिटर आहे. सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर प्रती लिटर दरात मिळत आहे. महानगरांपैकी मुंबईत इंधन दर सर्वाधिक आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत असतात. सकाळी सहा वाजता हे दर बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS च्या माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP लिहून शहराच्या कोड नंबरसह ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मेसेज पाठवून दराची माहिती घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here