पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे नवे दर आज जारी केले आहेत. आजही इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अडीच महिन्यांपासून इंधन दराबाबत दिलासा मिळत आहे. दिल्लीत पेट्रलचा दर ९५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर असा स्थिर आहे.

आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार नोएडामध्ये पेट्रोल ९५.५१ रुपये आणि डिझेल ८७.०१ रुपयांत मिळत आहे. तर लखनौमध्ये पेट्रोलचा दर ९५.२८ रुपये आणि डिझेलचा दर ८६.८० रुपये आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये ८२.९६ रुपये दराने पेट्रोल तर डिझेल ७७.१३ रुपये प्रती लिटरने मिळत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये तर डिझेल ९४.८७ रुपये प्रती लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटर आहे चेन्नईत पेट्रोल १०१.४९ आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. भोपाळमध्ये १०७.२३ रुपये दराने पेट्रोल आणि ९०.८७ रुपये प्रती लिटर दराने डिझेल विक्री सुरू आहे. तर बंगळुरुमध्ये पेट्रोलचा दर १००.५८ रुपये आणि डिझेल ८५.०१ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात. BPCLचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर मेसेज करून माहिती मिळवू शकतात. तर HPCL चे ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर मेसेज पाठवून दर जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here