पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या किती आहे बदल

नवी दिल्ली : सरकारी इंधन कंपन्यांनी आज, शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बड्या महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थे आहेत. तर काही शहरांमध्ये या दरात किरकोळ बदल करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नई पेट्रोल १०२.६३ आणि डिझेल ९४.२४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटर आहे.

दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, ब्रेंट क्रूड ०.८१ डॉलर अथवा ०.९३ टक्के घसरुन ८६.६६ डॉलर प्रती बॅरलवर आला आहे. तर डब्ल्युटीआय क्रूड १.३३ डॉलर अथवा १.६४ टक्के घसरुन ७९.६८ डॉलर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या आधारावर ऑईल मार्केटिंग कंपन्या किमतीचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरांची निश्चिती करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या विविध शहरांतील इंधन दरात अपडेट करतात. एका SMSवर तुम्ही शहरातील पेट्रोल, डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP लिहून मेसेज ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here