एमआरएन समुहाकडून ऊस गाळप उच्चांकी क्षमतेने करून नवा विक्रम

मुधोळ (कर्नाटक) : देशातील प्रमुख साखर निर्माता MRN समुहाने या वर्षी उच्चांकी ऊस गाळप करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. समुहाने एका दिवसात ६०,९७५.९८३ मेट्रिक टन ऊस गाळप करुन उच्चांक केला आहे. एमआरएन समुहाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व युनिटने या वर्षी आपली उच्च गाळप क्षमता मिळवली आहे. अशा प्रकारे देशातील सर्वात कुशल, सफल आणि विश्वसनीय साखर उत्पादन युनिटचा मान त्यांनी मिळवला आहे.

१९५५ मध्ये स्थापन झालेल्या MRN समुह कर्नाटकातील सफल व्यावसायिक समुहापैकी एक आहे. हा समुह साखर कारखान्याशी संबंधित कृषी उद्योग, सीमेंट, बँकिंग, सीएनजी, एनएनजी आणि इथेनॉल उत्पादन अशा विविध क्षेत्रात सक्रीय आहे. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळमध्ये मुख्यालय असलेला कर्नाटकातील हा समुह देशात साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर आहे.

MRN समुहाची स्थापना एक मेहनती, युवा, उद्योगपती डॉ. मुरगेश निरानी यांनी केली आहे. त्यांचा जन्म बागलकोट जिल्ह्यातील बिलगी येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर डॉ. मुरगेश निरानी यांनी आपली उद्दीष्टे निश्चित केल्यानंतर त्यांनी त्यासाठी आपले काम सुरू केले. सुरुवातीपासून त्यांनी छोट्या उद्योजकाच्या रुपात काम सुरू केले. कर्नाटकातील एक बड्या व्यापारी समुहामध्ये त्याचे रुपांतर होण्यासाठी अविरत कष्ट केले.

त्यांनी बागलकोट येथे एक छोट्या ऊस गाळप युनिटसोबत आपला व्यवसाय केवळ ५०० टीसीडी प्रती दिन गाळप क्षमतेने सुरू केला. आता याची संयुक्त गाळप क्षमता ७०,००० टीसीडी प्रती दिन आहे. साखर उद्योगाशीवाय MRN समुह विविध व्यवसायांमध्ये पसरला आहे. आज हा समुह निरानी शुगर्स, श्री साई प्रिया शुगर्स लिमिटेड, एमआरएन क्रेन पॉवर इंडिया लिमिटेड, केदारनाथ शुगर्स लिमिटेड आणि बदामी शुगर्स लिमिटेडसह अनेक साखर कारखान्यांचे यशस्वीपणे व्यवस्थापन करतो.

मुरुगेश निरानी, जे सध्या कर्नाटक सरकारमध्ये उद्योग मंत्री आहेत, त्यांनी या समुहाच्या माध्यमातून ७०,००० पेक्षा अधिक लोकांना रोजगार प्रदान केला आहे. ते आपल्या संस्थांच्या माध्यमातून युवकांना उद्यमशील बनविण्यासाठी प्रशिक्षण आणि नव कौशल्ये प्रदान करतात. त्यांचा उद्देश केवळ युवकांना आत्मनिर्भर बनविण्याचा आहे.

आपल्या उद्योगाला सफलतापूर्वक स्थापन केल्यानंतर निरानी यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या सार्वजनिक जीवनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी आपला मुलगा विजय निरानी याला व्यवसायाची जबाबदारी सोपवली.

एमआरएन समुह आपली मूल्ये आणि व्हिजनचे कठोरपणे पालन करण्यासाठी ओळखला जातो. ७०,००० हून अधिक लोकांना रोजगार देणारी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि भल्यासाठी कोठेही समझोता करत नाही. समुहाची साखर आणि कृषी उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशात इथेनॉल उत्पादनात आपली भूमिका अग्रेसर ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कर्नाटक आणि मंड्या-म्हैसूर या क्षेत्रात १.४ लाखाहून अधिक शेतकरी कुटुंबे एमआरएन समुहाच्या कारखान्यांवर अवलंबुन आहेत.

एमआरएन ग्रुपच्या अंतर्गत येणाऱ्या साखर कारखान्यांची गाळप क्षमता उच्च स्तरावर पोहोचून नवा विक्रम झाला आहे. निरानी शुगर्स लिमिटेडने २३,१८७ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. तर श्री साई प्रिया शुगर्स लिमिटेडने १६४११ मेट्रिक टन ऊस गाळप केले. एमआरएन केन पॉवर इंडिया लिमिटेडने ८६२३ एमटीएस नोंदला आहे. तर केदारनाथ शुगर्स लिमिटेडने आपली उच्च गाळप क्षमता बनवली असून ६०४८ मेट्रिक टन गाळप क्षमता करून उच्चांक प्रस्थापित केला आहे.

एमआरएन समुहाचे व्यवस्थापन युवा मुख्य व्यवस्थापन विजय निरानी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वात एमआरएन समुह नव्या विस्ताराच्या शोधात अधिक बळकट झाला आहे. त्यांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. विजय निरानी यांनी सांगितले की, मी या नव्या विक्रमाबाबत शेतकरी आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या सहकार्याने आणि कठोर मेहनतीमुळे आणि शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला हे यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here