ब्राजीलमध्ये इथेनॉलच्या विक्रीचे नवे रेकॉर्ड

ब्राजीलमध्ये गेल्या वर्षी 32.8 बिलियन लीटर असे इथेनॉल विक्रीचे रेकॉर्ड झाले आहे. जे पहिल्या वर्षाच्या विक्रीच्या तुलनेत 10.5 टक्के अधिक आहे.

ब्राजीलीयन शुगरकेन इंडस्ट्री असोसिएशन (यूएनआईसीए) यांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, ब्राजीलच्या बाजारात गेल्या वर्षी 32.8 बिलियन लीटर इथेनॉलची विक्री झाली आहे. यामध्ये हाइड्रेटेड इथेनॉलची मात्रा अधिक होती. याचा वापर शुद्ध इंधनाच्या रुपात केंला जातो. या विक्रीमध्ये 22.5 बिलियन लीटर हायड्रेटेड इथेनॉल तसेच उर्वरीत 10.3 बिलियन लीटर एनहाइड्रस इथेनॉलच्या विक्रीचा सहभाग आहे. एनहाइडस इथेनॉलचा वापर गैसोलीन बरोबर केला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घटत्या किमतींमुळे ब्राजील ला इथेनॉलच्या अधिक उत्पादनावर जोर देण्यात मदत केली आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने किमती कमी केल्या आहेत आणि कारखाने आपल्या आवडीच्या इथेनॉल उत्पादनाकडे वळले आहेत, कारण गैसोलीनच्या किमंती वाढत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here