कोल्हे कारखान्यातर्फे राज्याचे नूतन साखर आयुक्त अनिल कवडे यांचे स्वागत

अहमदनगर : राज्याचे नूतन साखर आयुक्त म्हणून अनिल कवडे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी त्यांचे पुण्यातील साखर संकुलात स्वागत केले.

यावेळी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी राज्यातील सध्याच्या साखर उद्योगाबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सहकारातील इनोव्हेटिव्ह, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आदी पुरस्कार मिळवत राज्यात नावलौकीक मिळवल्याची माहिती त्यांना देण्यात आली. कवडे यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले असल्याने स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची माहिती असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here